अधिक मासानिमित्त कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न, पिंपळे गुरवकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अधिक मासानिमित्त कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न, पिंपळे गुरवकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    पिंपरी , (प्रबोधन  न्यूज )  -   अधिक मास पुरुषोत्तम पर्वकाळ निमित्त पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने  अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री एकनाथी गाथा पारायण सोहळ्याचे रामकृष्ण मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या हरिनाम सप्ताहाला पिंपळे गुरवकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

          या हरिनाम सप्ताहात ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठण, ह.भ.प. कानोबा महाराज देहूकर, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. केशव महाराज उखळीकर, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी कीर्तनरुपी सेवा दिली, तर ह.भ.प. डॉ. गजानन महाराज वाव्हळ, ह.भ.प. निवृत्ती महाराज बोरकर, ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर, ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. गणेश महाराज शिंदे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी व्याख्यानरुपी सेवा दिली. तर ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचे काल्याचे कीर्तन झाले.  

           या सप्ताहात आमदार अश्विनीताई जगताप, नाट्यपरिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, उद्योजक विजय जगताप, वृक्षमित्र अरुण पवार, श्री दत्त आश्रमाचे ह.भ.प. शिवानंद स्वामी महाराज, खाडे बाबा मंदिराचे ह.भ.प. राघवचैतन्य महाराज, सांगवी बालयोगी दत्त आश्रमाचे ह.भ.प. तुकाराम महाराज,आयोजक विजूअण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, श्री गणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, अभिषेक जगताप, श्याम जगताप, उद्योजक संजय भिसे, कुंदाताई भिसे, शत्रुघ्न काटे, अर्जुन शिंदे, सुरेश हुलावळे, बाळासाहेब विनोदे, राजू करपे, मोहनदादा भुमकर, बाळासाहेब भुमकर, महादेव भोईर, संतोष मोहोळ, कांतीलाल पायगुडे, दिलीप भरणे, दत्ता गायकवाड, सुरेश भोईर, जयदीप ठाकर, गोरख ओझरकर, दिलीप भरणे, शांताराम पाडाळे,  दत्ता भोंडवे, प्रवीण साखरे, संतोष बालवडकर, संतोष मारणे यांच्यासह पिंपळे गुरव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

          आठवडाभर दररोज दोन हजाराहून नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. याबद्दल नागरिकांनी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या दातृत्वाची मोठ्या मनाने प्रशंसा केली.