A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिंपरी-चिंचवड शहर व राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार, सरपंच बालाजी पवार व श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहूगाव व माऊली भक्त यांच्या संयुक्तपणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे ५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ५००० वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. त्याची सुरुवात भंडारा डोंगर येथे वृक्षारोपण करून करण्यात आली. दरम्यान, अरुण पवार यांनी आवाहन केल्यानंतर भंडारा डोंगर देवस्थान बांधकामासाठी ज्येष्ठ नागरिकांसह युवकांनी मिळून 51 हजार रुपयांचा निधी भंडारा डोंगर देवस्थान सदस्य जगन्नाथ नाटक पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, सदस्य जगन्नाथ नाटक पाटील, सदस्य गोपाळ पवार, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, रामभाऊ कऱ्हाळे, ह.भ.प. माऊली ढमाले, उद्योजक डी. एस.राठोड, ह.भ.प. डॉ. गजानन वाव्हळ, माजी नगरसेवक आप्पा बागल, आण्णा जोगदंड, संगिता जोगदंड, बळीराम माळी, बाळासाहेब सांळुखे, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती सदस्य नितीन चिलवंत, मराठवाडा जनविकास संघ सोशल मिडीया मराठवाडाप्रमुख अमोल लोंढे, रोहीत जाधव, कॅ. प्रमोद आग्रे, पुष्कराज जोशी, शुभांगी जोशी, हनुमंत काशीद, मुंजाजी भोजने, पुणाजी रोकडे, बळीराम माळी, वृक्षमित्र सोमनाथ कोरे, लक्ष्मण कोन्हाळे, नागेश जाधव, धोडींबा काटे, रेखा दुधभाते, अनिल पाटील, गौतम रोकडे, रंजीत कानकट्टे यांच्यासह भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ, श्री. स्वामी समर्थ महिला मंडळ काशीद पार्क, वंदे मातरम् संघटना, आर जे स्पोर्ट अकॅडमी, वारकरी यांच्या उपस्थितीत 'झाडे लावा झाडे जगवा', 'झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी' या घोषणा देत वृक्षारोपण करण्यात आले.
चौकट :
५००० वृक्ष लागवडीचा संकल्प : अरुण पवार
मराठवाडा मुक्तीसंग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ५००० वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. त्याची सुरुवात भंडारा डोंगर येथे 500 रोपांचे वृक्षारोपण करून करण्यात आली. उर्वरित 4500 वृक्ष लागवड धारूर, हिप्परगा रवा, आपसिंगा, मोरडा, वाडी बामणी, केशेगाव, बावी आदी ठिकाणी करण्यात येणार आहे.