बनावट कंपनीचे नेमणूकपत्र देत 16 जणांची फसवणूक, कंपनी व कन्सलटंन्सी मालकांवर गुन्हा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बनावट कंपनीचे नेमणूकपत्र देत 16 जणांची फसवणूक, कंपनी व कन्सलटंन्सी मालकांवर गुन्हा
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - बेरोजगारी किंवा अधिक पगाराच्या आमिषाने सध्या कन्सलटन्सी द्वारे मोठमोठ्या कंपनीमध्ये जॉब चे आमिष दाखवले जाते. या मध्ये जॉबसाठी आधिच तुमच्या कडून लाखोमध्ये कमीशन स्वरूपात रक्कम घेतली जाते. याच शॉर्टकट च्या फंद्यात पडत 16 जणांची तब्बल 24 लाख रुपयांची फसवणूक कऱण्यात आली आहे. त्यांना मोठ्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखवत चक्क बनावट कंपनीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. हा सारा धक्कादायक प्रकार 12 ऑगस्ट 2022 ते 18 जून 2022 या कालावधीत भोसरी येथे घडला आहे.
याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात कमलेश पंढरिनाथ गंगावणे (वय 40 रा.काळेवाडी) यांनी फिर्याद दिली असून महेशकुमार कोळी (रा. भोसरी) , महिला आरोपी,  सुरज महाले (रा. पुणे) व श्रावण शिंदे , अनुदिप शर्मा पशुपती यांच्यावरफसवणूकीचागुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या 15 साथीदारांना टेक्नॉलॉजी एस.ए.पी.एम कंपनी व एम.के. मॅनेजमेंट सर्व्हिस हि जॉब देणारी कंपनीचे मालक महेशकुमार व कन्सलटन्सी चे मालक महिला आरोपी,  सुरज व श्रावण यांनी मिळून अनुदिप शर्मा याच्या विमाननगर येथील कंपनीत जॉब लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 1 लाख 68 हजार रुपये तर इतर 15 जणांकडून 22 लाख 58 हजार रुपये असे एकूण 24 लाख 26 हजार रुपये घेतले. त्याबदल्याते त्यांनी अस्तित्वातच नसलेल्या कंपनीचे बनावट नियुक्तीपत्रे  देत या 16 जणांची फसवणूक केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.    
एरवी दहा रुपयांची भजीची जुडी घेणार आपण मात्र अशा लाखो रुपयांच्या भुलथापांना बळी पडतो अन स्वतःचे मोठे नुकसान करुन घेतो. सध्या केवळ अशिक्षीत नाही तर उच्चशिक्षीत लोकही झटपट पैसा, पटकन नोकरी , लग्न अशा आमिषांना बळी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खात्री पटल्या शिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करु नये असे पोलिसांनी अवाहन केले आहे.