आंतरराष्ट्रीय कंपनीतून बोलत असल्याचे सांगत एकाची साडे सहा लाखांची फसवणूक

आंतरराष्ट्रीय कंपनीतून बोलत असल्याचे सांगत एकाची साडे सहा लाखांची फसवणूक
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे याच्यावर बोलत असल्याचे सांगत एका महिलेने तरुणाची तब्बल साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 31 मे ते 3 जून 2023 या कालावधीत पिंपरी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली आहे  .
याप्रकरणी प्रतीक कौशल किशोर कँसल (वय 37 राहणार पिंपरी) यांनी सोमवारी (दि.26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मीरा रुबीना (पूर्ण नाव माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सअप क्रमांक 91 7402346242  या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी यांना मेसेज पाठवण्यात आला यावेळी मीरा रुबीना बोलत असून HUBSOT AN AMERICAN GLOBLAL MEDIA MARKETING & CORPORATE COMMUNICTION HOLDING COMPANY या कंपनीची एच आर मॅनेजर असल्याचे सांगत फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ऑनलाईन पद्धतीने फिर्यादी यांची सहा लाख 65 हजार 650 रुपयांची फसवणूक केली आहे यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.