भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा आली रुळावर; सोने आणि वाहनांच्या मागणीत वाढ

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा आली रुळावर; सोने आणि वाहनांच्या मागणीत वाढ


दिल्ली - सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यामुळे भारत पुन्हा एकदा वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या सणासुदीला मागणी आणि खप वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून लोकांमध्ये खरेदीची धामधूम सुरू आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळी यांसारख्या सणांमुळे या महिन्यात ग्राहकांची भावना भक्कम आहे. नवीन ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील भावना गेल्या महिन्यात खूप मजबूत राहिली. बँकांच्या कर्ज वितरणातही वेगाने वाढ झाली आहे कारण देश कोविडच्या छायेतून जवळपास बाहेर पडला आहे.

सप्टेंबरमध्ये निर्यात २३% वाढली. या प्रकरणातहीऑगस्टच्या तुलनेत १.६ % वाढ झाली. पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, कॉफी आणि हिर,रत्ने यांना जास्त निर्यात मागणी आली. गेल्या महिन्यात सोने आयातीत वार्षिक आधारावर २५४% वाढ झाली. तर ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन ११.९ % वाढले. पायाभूत सुविधा क्षेत्राचे उत्पादन, जे औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ४०% आहे त्यात ११.६ % वाढ झाली. खरीप हंगामानंतर येत्या काही महिन्यांत ग्रामीण उत्पन्न आणि मागणी वाढेल.

गेल्या महिन्यात बॅकांच्या कर्ज वितरणात ६.७ वाढ झाली. ऑगस्टमध्येही बँक कर्जवाटप वाढले होते. त्यामुळे गेल्या महिन्यातही बाजारात जास्त तरलता होती. याचाच अर्थ आगामी सणांमध्ये कर्जवाटप वाढवण्यास बँका पूर्णपणे सक्षम आहेत. महागाई वाढली असली तरी वाहनांना मागणी जोरात आहे. कार आणि एसयूव्हीला इतकी जोरदार मागणी आहे की काही मॉडेल्ससाठी प्रतीक्षा कालावधी एक वर्षांच्या पलीकडे गेला अाहे.काही कंपन्यांनी चिपच्या कमतरतेमुळे उत्पादन कमी केले. गेल्या महिन्यात उत्पादन व सेवा क्षेत्राचा कंपाेझिट पर्चेसिंग इंडेक्समध्ये (पीएमअाय) सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली. कंपन्यांचा वाढता उत्पादन खर्च व काही कच्च्या मालाचा तुटवडा असतानाही हे यश प्राप्त झाले.