भक्ती-शक्ती चौकात गॅस टँकर उलटला; सावधानतेसाठी निगडी परिसरात वीजपुरवठा बंद
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - निगडीमधील भक्ती-शक्ती चौकात एलपीजी गॅसचा टँकर उलटल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवारी (दि. २५) पहाटे निगडी गावठाण व परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता व सायकांळी ५ वाजता पूर्ववत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, निगडीमधील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकरला पहाटे अपघात झाला व उलटला. टँकरमध्ये गॅस असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार महावितरणकडून निगडी गावठाण, सेक्टर २४ व २६ तसेच साईनाथनगर परिसरातील सुमारे ५५० ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सेक्टर २६ मधील वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र पोलीस विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित परिसरात वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला व सायंकाळी ५ वाजता पूर्ववत करण्यात आला.