सोलापूर रस्त्यावरील अपघातात पोलिसासह चौघांचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सोलापूर रस्त्यावरील अपघातात पोलिसासह चौघांचा मृत्यू

पुणे (प्रबोधन न्यूज) - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर चौफुल्याजवळील वाखारी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. येथे एका बंद पडलेल्या ट्रकला प्रवासी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील चौघांचा मृत्यू झाला असून, 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील सायबर सेलमध्ये कार्यरत असणाऱ्या नितीन शिंदे या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, दि. 1 फेब्रुवारी, 2023 रोजी पहाटे साडेचार ते पावणे पाचच्या सुमारास हा अपघात चौफुलीजवळ वाखारी गावच्या हद्दीमध्ये झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये नितीन दिलीप शिंदे (वय ३६ राहणार हडपसर पुणे), आरती बिराजदार (वय २५ राहणार पुणे), अमित कलशेट्टी (वय २० राहणार सोलापूर), गणपत पाटील (वय ५५ वर्ष राहणार कात्रज पुणे) अशी नावे आहेत. तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी प्रवास करीत होते.

अपघातानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी भेट देऊन यवत पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर यवत पोलिसांनी जखमींना केडगाव चौफुली व लोणी येथील विश्वराज रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने हलवले.

पोलीस नाईक शिंदे हे सोलापूरहून पुण्याकडे घरी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांना काळाने गाठले. या अपघातात मरण पावलेले नितीन दिलीप शिंदे हे पोलीस नाईक या पदावर कार्यरत होते. ते एक उत्कृष्ट खेळाडू होते. ॲथलेटिक्स प्रकारात ते उत्कृष्ट रनर होते. पुणे शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना विविध गुन्ह्यातील त्यांचा आरोपी पकडण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. हडपसर पोलीस स्टेशन मध्येही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

पोलीस दलात हळहळ....

नितीन शिंदे यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक उमदा व चांगला सहकारी अपघाती निधनात गेल्याची दुःखद भावना हडपसर पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. शिंदे हे कुटुंबातील कर्ते होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुली संस्कृती (वय 13) व गिरीजा (वय ११) असा परिवार आहे. नितीन शिंदे यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.