ट्रान्सफॉर्मरमध्ये मनीमाऊ गेली जीवानिशी ! विजेविना ६० हजार लोकांची कासावीशी !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, दि. 23 मार्च - भोसरी, आकुर्डी विभागात ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडास चक्क एक मांजर कारणीभूत ठरली आहे ! या मनीमाऊने ट्रान्सफॉर्मरमध्ये शिरकाव केला, तिथे शॉक लागून तिचा जीव गेला आणि त्यानंतर भोसरी, आकुर्डी भागातील 60 हजार ग्राहकांना अंधारात बसण्याची वेळ आली.
महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे भोसरी आणि आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. पण हा सगळा प्रकार एका मांजरामुळे घडल्याचे निदर्शनास आले आहे. एक मांजर ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आल्यामुळे 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला.
भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रामध्ये 100 एमव्हीए क्षमतेचे दोन , 75 एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र त्यातील 100 एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण 26 वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र यातील 100 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण 10 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.
परिणामी प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती दिली.
दरम्यान आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने जाम वैतागलेत. उकाड्याच्या काळात लोक अंधारत बसले होते. काही जणांनी रस्त्यावर फेटफटा मारत महावितरणाच्या नावाने शिमगा केला.