देशात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

देशात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट


नवी दिल्ली - देशातील कोरोनाची रुग्णसंख्याही नियंत्रणात आली आहे. मात्र अशातच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. आतापर्यंत इंदौरमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटची प्रकरणे समोर येत होती. मात्र आता जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात AY-4 चे नवीन व्हेरिएंट आढळून आलं आहे. हा डेल्टाचाच एक नवीन व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे. इंदौरसह मध्य प्रदेशातून नवी दिल्लीतल्या NCDC लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची 7 प्रकरणं समोर आली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात AY-4 व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
इंदौरमध्ये सध्या दररोज एक किंवा दोन कोरोनाचं रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. 1 ते 16 ऑक्टोबरपर्यंतचे नमुने पाठवण्यात आले होते. 16 ऑक्टोबरच्या अहवालात 7 नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यापैकी दोन जण न्यू पलासिया, एक दुबेची बागआणि तीन महू येथील आहेत. त्याच वेळी, 1 ऑक्टोबरपर्यंतच्या अहवालात, 13 पैकी एका नमुन्यात AY-4 आणि चार नमुन्यांमध्ये AY-12 व्हेरिएंट आढळून आला आहे. यावर बोलताना एमजीएम ऑफ मेडिसिन, एमजीएम डॉ.व्ही.पी. पांडे म्हणाले की, कोरोना व्हायरसचे स्वरूप बदलत असतं. या प्रकाराच्या संसर्गाविषयी काहीही बोलणं योग्य नाही, कारण स्पष्ट अभ्यास झालेला नाही. दरम्यान भारतात दिली जाणारी लस सर्व प्रकारांवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. पुढील 4-5 वर्षे, आपल्याला दरवर्षी लस घ्यावी लागणार आहे.