'स्पायडरमॅन' करत आहे रेकॉर्डवर रेकॉर्ड, दोन दिवसांत केले जबरदस्त कलेक्शन ! 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'स्पायडरमॅन' करत आहे रेकॉर्डवर रेकॉर्ड, दोन दिवसांत केले जबरदस्त कलेक्शन ! 

नवी दिल्ली - 

शुक्रवारी 3000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला 'स्पायडर-मॅन: नो वे होम' नवनवे विक्रम करत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३५ कोटींची विक्रमी कमाई केली होती, आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. कोरोनाच्या काळात एका चित्रपटाची इतकी क्रेझ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. चित्रपटाच्या दमदार सुरुवातीनंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

० दुसऱ्या दिवशीही विक्रमी कमाई
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, 'स्पायडर-मॅन: नो वे होम'ने दुसऱ्या दिवशी 22 कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नवीन चित्रपट 'स्पायडरमॅन: नो वे होम'ने भारतात जे मोठे स्टार्सही करू शकले नाहीत ते या वर्षी करून दाखवले आहे. 'स्पायडर मॅन'ला उत्तम प्रतिसाद मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमधून मिळत आहे.

० ऍडव्हान्स बुकिंगमध्येच रेकॉर्ड तुटले
'स्पायडरमॅन: नो वे होम'ने केवळ आगाऊ बुकिंगमध्ये सुमारे 18 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाबाबतचा क्रेझ अशी आहे की, गुरुवारी, प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी, चित्रपटाची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आणि शनिवार आणि रविवारचे शो देखील हाऊसफुल्ल चालू आहेत. चित्रपटाची इतकी क्रेझ अलीकडच्या काळात भारतात क्वचितच पाहायला मिळते.

० भारतात रिलीज झालेल्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्वात मोठी ओपनिंग घेण्याचा विक्रम अजूनही मार्वलच्या 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' या चित्रपटाच्या नावावर आहे, ज्याने रिलीजच्या पहिल्या दिवशी 2019 मध्ये 53.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या चित्रपटाने वर्षभरापूर्वी बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवशी 31.30 कोटींची कमाई केली होती. या यादीतील तिसरा क्रमांक 'हॉब्स अँड शॉ' आहे, जो फक्त 2019 मध्ये रिलीज झाला होता, ज्याने भारतात 13.15 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती.

० स्पायडरमॅन सिरीज चित्रपटांचा भारतात चांगला व्यवसाय 
याआधी देशात प्रदर्शित झालेल्या टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅन चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला आहे पण 'स्पायडरमॅन : नो वे होम' या चित्रपटाची गोष्ट काही औरच आहे. चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'स्पायडरमॅन होमकमिंग' या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी ९.३६ कोटींची कमाई केली होती. यानंतर रिलीज झालेला 'स्पायडरमॅन फार फ्रॉम होम' चित्रपट यापेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही. पण 'स्पियरमॅन: नो वे होम' या चित्रपटाने थेट देशात रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या टॉप 10 ओपनर्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर प्रवेश केला आहे.