फटाके आणि अंडी उबवणी केंद्र ...! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बारामतीत विरोधकांवर तुफान बॅटिंग !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

फटाके आणि अंडी उबवणी केंद्र ...! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बारामतीत विरोधकांवर तुफान बॅटिंग !
पवार कुटुंबियांचे केले भरभरून कौतुक 

बारामती -
दिवाळीच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजे वसुबारसपासून राज्यातील राजकीय फटाके वाजू लागले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची माळ फुटू लागली आहे. सोमवारपासून अनेक घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक आतिषबाजी जोरात रंगली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बारामतीत मंगळवारी विरोधकांना टोलेरुपी फटाक्यांची मोठी माळच लावली ! 'दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका', असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. करोना संपलेला नाही. त्यामुळे मी हे विधान करतोय, अशी सारवासारवही मुख्यमंत्र्यांनी करताच एकच हशा पिकला. यानंतर त्यांनी 'राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजे. आम्हीही उबवणी केंद्रे निर्माण केली होती. आम्ही नको ती अंडी उबवली. आता त्याचं काय झालं ते तुम्ही पाहातच आहातच', असा टोला नारायण राणे यांना नाव न घेता लगावला. मुख्यमंत्रांच्या या तुफान बॅटिंगची आज चांगलीच चर्चा रंगली. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पवार कुटुंबियांवर कौतुकाचा वर्षाव देखील केला. शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. त्यांनीच महाराष्ट्राला विकासाचा सूर्य दाखवला. पवारसाहेब अजूनही नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचं आणि या संस्थांचं. सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे. कुटुंब रंगलं काव्यात तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीत अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

'किमान विघ्न तर आणू नका'! 
राजकारणात टीकाकार असतात असलेच पाहिजे. आम्हीही इतके दिवस तुमचे टीकाकार आहोत. शिवसेना प्रमुख म्हणायचे, अरे शरदबाबू बारामतीत काय करतात ते जरा बघितलं पाहिजे. हे असे संबंध होते. राजकारणात पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणं योग्य नाही. पाठिंबा देता येत नाही तर किमान विघ्न आणू नये. पण काय करावं आपल्याकडे अनेक विघ्नसंतोषी लोकं आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

'बारामतीत सगळंच शिकवलं जातं'
गाडीतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती नंबर दोनचं केंद्र बनेल, मुख्यमंत्र्यांनी असं म्हणताच एकच हशा पिकला. बारामती राजकारणाचं केंद्र आहेच. पण शिक्षणाचंही केंद्र होणार आहे. इथे सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात, असं त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.