बाहा एस. ए. ई. इंडिया -२०२२ ' या राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा रेड बॅरन संघ देशात प्रथम

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बाहा एस. ए. ई. इंडिया -२०२२ ' या राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा रेड बॅरन संघ देशात प्रथम

पिंपरी-चिंचवड, दि. २० एप्रिल - पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीम रेड बॅरन ने बाहा एस ए ई इंडिया -२०२२ या राष्ट्रीय स्पर्धेत स्टॅटिक ईव्हॅल्यूएशन प्रकारात देशात प्रथम क्रमांकसह एकूण सहा पारितोषिके पटकावली. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंग (एस. ए. ई.) दरवर्षी विद्यार्थ्यांना ऑल टरेन या प्रकारातील वाहन डिझाइन व उत्पादनाचा अनुभव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करते.

पिथमपुर येथे यावर्षी देशभरातील 80 नामांकित महाविद्यालयाच्या संघांनी आपल्या यंत्राच्या डीझाईन सादर केल्या. त्यामध्ये एनआयटी सारख्या अग्रगण्य महाविद्यालयांचा ही सहभाग होता. उच्च तंत्रज्ञान व संशोधनाव्दारे मानवी जीवनस्तर अधिक उंचावण्यासाठी पीसीईटीच्या सर्व महाविद्यालयातून ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगला’ प्रोत्साहन व विविध तांत्रिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील रेड बॅरन संघाने या स्पर्धेत स्टॅटिक ईव्हॅल्यूएशन (प्रथम), सर्वोत्कृष्ट फोर व्हिल ड्राईव्ह वाहन (प्रथम), सीएइ ईव्हॅल्यूएशन (व्दितीय), इंजिनिअरिंग डीझाईन (तृतीय), कॉस्ट ईव्हॅल्यूएशन (तृतीय) एकूण पाच पारितोषिके पटकावत चौथे राष्ट्रीय मानांकन मिळवले.

टीम रेड बॅरनचे आकाश कानडे (कर्णधार), ऋतुराज लोणकर (उप कर्णधार), हृषिकेश निकम, सौरभ नाचन, अभिजित सोमाणी, कृष्णा निंबाळकर, भूषण मोहोळ सह एकूण ३२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. मार्गदर्शक प्रा. उम्मीद शेख आणि मेकॅनिक विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी तसेच डॉ. गोविंद कुलकर्णी (संचालक, पीसीसीओई), डॉ. नीळकंठ चोपडे (उपसंचालक), डॉ.पद्माकर देशमुख (मेकॅनिकल विभाग प्रमुख), डॉ. स्वाती शिंदे (डीन रिसर्च अँड ईनोव्हेशन) डॉ. शीतलकुमार रवंदळे (डीन, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटर अँक्शन), डॉ. पी. आर. काळे (डीन स्टूडेंट डेव्हलपमेंट) यांनी आणि पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.