शहर राष्ट्रवादीकडून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

शहर राष्ट्रवादीकडून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करूण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारं खुली करून दिली. ते विकासाची नवी दिशा देणारे, जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी लोककल्याणकारी राजे होते,  परिवर्तनवादी विचार रुजवण्यासाठी ते झटणारे एक आदर्श शासनकर्ते होते असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
यावेळी  शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, नगरसेवक मयुर कलाटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे,  संघटक नारायण बहिरवाडे, प्रवक्ते विनायक रणसुभे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, देवेंद्र तायडे, सरचिटणीस राजन नायर, सुदाम शिंदे, अरूण थोपटे, के.डी.वाघमारे,  महिला उपाध्यक्ष सपना कदम, अमरिन पटेल, चिटणीस राजू चांदणे, दत्तात्रय बनसोडे, स्मिता वाघोले, अण्णा पाखरे,सुनिल अडागळे, धनाजी तांबे  इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.