कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढावे – रावसाहेब दानवे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढावे – रावसाहेब दानवे

चिंचवड (प्रतिनिधी) – कै. लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघात विकास कामे केली. त्यांनी आयुष्यभर केलेल्या विकासकामांना थेरगाव ग्रामस्थांनी एकत्र येत पोचपावती दिली. पोटनिवडणूक असल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत कमी पडता कामा नये. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मतदानादिवशी प्रत्येक मतदाराच्या घरांपर्यंत जाऊन त्यांना मतदानासाठी बाहेर काढावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगाव ग्रामस्थांची दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे विधीमंडळातील पक्षप्रतोद भरत गोगावले, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे, माजी नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, सिद्धेश्वर बारणे, माजी नगरसेविका मनिषा पवार, विमल जगताप, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य संदिप गाडे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, काळुराम बारणे, करिष्मा बारणे, नरेंद्र माने, संतोष गुलाब बारणे यांच्यासह थेरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरात विकास कामे केली. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोटनिवडणूक ही संधी आहे. सर्व थेरगाव ग्रामस्थांनी एक होऊन त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा मिळवून काम करूया, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले केले.