पंजाबमध्ये केजरीवालच 'मॅन ऑफ द मॅच' !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पंजाबमध्ये केजरीवालच 'मॅन ऑफ द मॅच' !

(राजेंद्र आठवले)

त्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा व पंजाब या राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपने चार राज्यांत तर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये यश मिळवलेले आहे. आम आदमी पक्षाचे संस्थापक व दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी पंजाबमध्ये काँग्रेस, अकाली दल, भाजप यांना धोबी पछाड देत राज्यात प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष निवडून येईल असे भाकित राजकीय विश्लेषकांनी केले होते. पण या विश्लेषकांनाही आम आदमी पार्टी एवढा प्रचंड विजय मिळवेल अशी कल्पनासुद्धा आली नसेल. केजरीवाल यांनी एकट्याच्या जिवावर ही विजयश्री खेचून आणली आहे. केजरीवाल यांनी दाखविलेली विकासाची स्वप्ने पंजाबी लोकांना भावली असल्याचे दिसून आले आहे. केजरीवाल यांचा शांत स्वभाव, मुद्देसूद बोलणे, विरोधकांच्या आरोपांवर तोल न ढळू देता शांतपणे प्रत्युत्तर देणे व विरोधी पक्षांवर टीका न करता विकासाच्या मुद्यावर भाषणात जोर देणे या गोष्टी त्यांना सत्तेची विजयश्री मिळवून दिली. आता देशात दोन राज्ये आम आदमी पक्षाच्या ताब्यात आली आहेत. दोन्ही राज्ये टिकवून ठेवून पुढील निवडणुकीत इतर राज्यांवर पकड मिळवण्यासाठी त्यांची आता राजकीय वाटचाल असेल. दोन राज्ये केजरीवाल यांच्या छताखाली आल्यामुळे देशातील राजकारणात त्यांचा दबदबा नक्कीच वाढणार आहे.  


काँग्रेसची पंजाबमधील सत्ता गमावण्यामागे फक्त आणि फक्त काँग्रेसच आहे. पक्षांतर्गत प्रचंड कलह काँग्रेसला भोवला आहे. नवज्योतसिंग सिद्धूला नको इतके हाय कमांडने महत्त्व दिल्याने काँग्रेसवर ही वेळ ओढवली आहे. निवडणुकीच्या 1 वर्ष अगोदर तत्कालिन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना हटविण्यात आले. तेही फक्त सिद्धूच्या सांगण्यामुळे. वास्तविक अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असते तर पक्षाला इतका दारूण पराभव स्वीकारावा लागला नसता. अमरिंद सिंग यांची पंजाबमध्येच नाही तर देशभर चांगली इमेज आहे. त्यांना हटवून काँग्रेसने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यांच्या जागी चन्नीला आणले गेले तरीही सिद्धूचा आत्मा असंतुष्टच राहिला. त्यांच्याबरोबरही त्याचे वाद सुरूच राहिले. सिद्धूला मुख्यमंत्री होण्याची इतकी घाई झाली होती की, त्याने पक्षामध्ये आपले वजन वाढविण्यासाठी दबाव गट तयार केला. असे म्हणतात की, चन्नी दोन जागांवर निवडणूक लढविण्यामागे सिद्धू कारणीभूत आहे. सिद्धू आपला काटा काढू शकतो या शंकेने त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढविली. जनता त्यांच्या या खेळाला वैतागली होती. काँग्रेसच्या हातात पुन्हा सत्ता दिली तर हाच खेळ पाच वर्षे पाहायला लागेल याची त्यांना खात्री पटली. सुरक्षा, सुविधा, विकास, रोजगार, नशेचे थैमान रोखणे हे सर्व मुद्दे यांच्या सत्ता खेळात मागे पडले. त्यामुळेच पंजाबी लोकांनी काँग्रेसला धडा शिकावला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.


आणखी एक प्रमुख पक्ष म्हणजे अकाल दल. त्यांनाही काँग्रेसच्या अगोदर पाच वर्षे सत्ता दिली होती. अकाली दल सीमेपलीकडून होणारा नशेचा व्यापार थांबवू शकले नाही. काही सत्ताधारी मंत्र्यांचा हात नशेचा व्यापार करणाऱ्यांच्या डोक्यावर होता असा आरोप होत होता. अकाली दलच्या काळात पंजाबमध्ये तरुण मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेले होते. त्यामुळे 'उडता पंजाब' असे पंजाबला देशभर हिणवण्यात येत होते. त्यामुळे त्यांनाही या निवडणुकीत मतदारांनी थारा दिला नसल्याचे स्पष्ट झाले. भाजप पंजामध्ये गेल्या निवडणुकीत फक्त 3 आमदार होते. पंजाबमध्ये भाजपची ताकद नाही त्यामुळे जरी पंतप्रधानांनी पंजाबमध्ये सभा घेतली तरी त्याचा मतदारांवर परिणाम झाला नाही.

विकास कामांकडे दुर्लक्ष करून एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या पक्षांना मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. देशातील इतर पक्षांना विचार करायला लावणारा पंजाबमधील हा निकाल आहे हे नक्की.