टाळेबंदीच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला रिक्षाचालकांना मदतीचा हात !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

टाळेबंदीच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला रिक्षाचालकांना मदतीचा हात !

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील रिक्षाचालकांना या टाळेबंदीच्या कठीण काळात मदतीचा हात दिला आहे. त्यानुसार आता महापालिकेकडून शहरातील रिक्षाचालकांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे रिक्षाचालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.    

रिक्षा पंचायतीच्या वतीने आयुक्त तसेच महापौरांकडे टाळेबंदीत रिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य करण्याविषयी लेखी मागणी करण्यात आली होती. आ. अण्णा बनसोडे यांनीही ही मागणी उचलून धरत मनपा आयुक्तांची भेट घेऊन 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत अखेर पिंपरी चिंचवड मनपाने हा निर्णय घेतला. त्यानुसार आता शहरातील रिक्षाचालकांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला.          

महापालिका रिक्षा चालकांना कसे अनुदान देऊ शकेल ? असा प्रश्न जेंव्हा उपस्थित झाला, तेंव्हा शहराची पालक संस्था म्हणून LPG व CNG इंधनावरील रिक्षांसाठी मनपाने असे अनुदान दिल्याचा दाखला रिक्षा पंचायतीने समोर ठेवला.  LPG व CNG इंधनावरील रिक्षा पर्यावरण राखतात, प्रदूषण रोखतात.  म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने असे अनुदान द्यावे अशी मागणी रिक्षा पंचायतीनेच मनपाकडे केली होती. त्यासाठी आंदोलन व पाठपुराव्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांनी 2006  पासून लागू झालेल्या LPG रिक्षाना  2,500 रुपये व सन 2009 नंतर अमलात आलेल्या CNG रिक्षाना 12 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेवून हे अनुदान वितरीतही केले. यात पुणे मनपाने आधी पुढाकार घेतला व नंतर पिंपरी चिंचवड मनपाने ही योजना सुरू केली. टाळेबंदी संकटात मात्र आधी पिंपरी चिंचवड मनपाने तीन हजार रुपये मदतीचा निर्णय सर्वप्रथम घेवून राज्यातील पुणे मनपा सह इतर स्थानिक स्वराज्य संस्था समोर आदर्श उदाहरण घालून दिले आहे, अशी भावना रिक्षा पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या मागणीसाठी साठी रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार, अशोक मिर्गे, काशिनाथ शेलार यांनी विशेष प्रयत्न केले.