रुग्णालयातून बाहेर येताच शरद पवारांनी पक्षाला दिला मदतनिधी देण्याचा आदेश
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात केला जमा
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर केल्यानंतरआता राष्ट्रवादी काँग्रेसही मदतीसाठी पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहाय्यता फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात दिला आहे.
लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
सर्व आमदार-खासदारांचं महिन्याचं वेतन
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचे वेतन सीएम फंडात देणार आहेत. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन, जयंत पाटील यांनी केलं.
महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसेच राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहीजे यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज 1 कोटी आणि आमदार, खासदार यांचे महिन्याचे वेतन मिळून 1 कोटी असे दोन कोटी रुपये राष्ट्रवादीकडून देण्यात आले.
बाळासाहेब थोरातांची मोठी मदत
दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. थोरात यांनी स्वत:चं एक वर्षाचं आणि काँग्रेस आमदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर थोरातांच्या अमृत उद्योग समूह संगमनेरच्या 5 हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाचे पैसेही सीएम फंडात देण्यात येणार आहेत.