मुंबई-पुण्यातून महाराष्ट्रातील उर्वरित भागात जाणाऱ्या 19 रेल्वे गाड्या 30 एप्रिलपर्यंत रद्द
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लादण्यात आलेत. जिल्हाबंदीही लादण्यात आली असून, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरण्यासही मज्जाव केलाय. प्रवाशांची संख्या कमी असल्यानं रेल्वेलाही अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. 30 एप्रिल 2021 पर्यंत 19 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रवाशांची संख्या कमी असल्यानं रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द
विशेष म्हणजे याचा परिणाम रेल्वे प्रशासनावरही झालाय. प्रवाशांची संख्या कमी असल्यानं रेल्वेलाही अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. कमी प्रतिसादामुळे/प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने गाड्यांचे रद्दीकरण विस्तारीत करण्यात आलेय. 30 एप्रिल 2021 पर्यंत रद्द असलेल्या खालील गाड्यांचे कमी प्रतिसादामुळे /प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने रद्दीकरण वाढविण्यात आलेय.
लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवासी कमी असल्यानं या गाड्या रद्द
खरं तर 26 एप्रिल 2021 लाही रेल्वेच्या 10 प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्यात. मध्य रेल्वेच्या सुमारे 10 प्रवासी गाड्या 10 मेपर्यंत रद्द करण्यात आल्यात. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्यानं चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवासी कमी असल्यानं या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे :
1) ट्रेन क्रमांक 02147 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 07.05.2021 पर्यंत रद्द
2) ट्रेन क्रमांक -02148 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 08.05.2021 पर्यंत रद्द
3)ट्रेन क्रमांक 01131 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
4)ट्रेन क्रमांक -01132 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
5) ट्रेन क्रमांक 01404 कोल्हापूर -नागपूर विशेषच्या फे-या दि. 26.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
6) ट्रेन क्रमांक 01403 नागपूर -कोल्हापूर विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
7) ट्रेन क्रमांक 02041 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द
8) ट्रेन क्रमांक 02042 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द
9) ट्रेन क्रमांक 02239 पुणे अजनी विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द
10) ट्रेन क्रमांक 02240 अजनी -पुणे विशेषच्या फे-या दि. 02.05 .2021 पासून दि. 16.05.2021 पर्यंत रद्द
11) ट्रेन क्रमांक 02118 अमरावती -पुणे विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द
12) ट्रेन क्रमांक 02117 पुणे -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द
13) ट्रेन क्रमांक 02036 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द
14) ट्रेन क्रमांक 02035 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द
15) ट्रेन क्रमांक 01137 नागपुर -अहमदाबाद विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द
16) ट्रेन क्रमांक 01138 अहमदाबाद -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द
17) ट्रेन क्रमांक 02223 पुणे – अजनी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द
18) ट्रेन क्रमांक 09125 सुरत अमरावती विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द
19) ट्रेन क्रमांक 09126 अमरावती -सुरत विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द