दिघी येथे तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दिघी येथे तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

दिघी, (प्रबोधन न्यूज) - दिघी येथील तनिष पर्ल सोसायटी येथे बांधकाम साईटवर काम करत असताना एका कामगाराचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना 7 एप्रिल रोजी दुपारी घडली. याबाबत 15 एप्रिल रोजी कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत मरण पावलेल्या कामगाराचे नाव द्विजेन कुमार बिसवास (वय 32, रा. दलाईग्राम, जि. नदिया, पश्चिम बंगाल) असे आहे. जावेद याकुब खडखडे (वय 31, रा. विश्रांतवाडी, पुणे. मूळ रा. उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार मिनिनाथ गंगाधर टेमकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जावेद याने तनिष पर्ल सोसायटीमधील बांधकामाच्या कामाचे कंत्राट घेतले होते. त्या कामावर मयत द्विजेन काम करत होता. कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी कामगारांना सुरक्षेची साधने आरोपीने पुरवली नाहीत. साईटवर काम करत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.