आर. अश्विनचा आयपीएल स्पर्धेला 'रामराम'! म्हणाला, 'सध्या कोरोनाशी लढणारे कुटुंबीय महत्त्वाचे !'
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आणि आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आर. अश्विनने आयपीएल 2021 च्या उरलेल्या सामन्यांतून माघार घेतली आहे. सध्या माझं कुटुंब हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. कोरोनाने होत्याचं नव्हतं केलंय. माझं कुटुंब कोरोनाचा सामना करत आहे. अशावेळी मी त्यांच्यासोबत असणं महत्त्वाचं वाटतं. त्याचमुळे मी उरलेल्या सामन्यांतून माघार घेत आहे, अशी घोषणा आर अश्विनने ट्विट करुन केली आहे.
आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर करताना अश्विनने ट्विटमध्ये म्हटलंय, 'आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी उद्यापासून ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन.'
अश्विनचं कुटुंब कोरोनाशी लढतंय
रवीचंद्रन अश्विनचं कुटुंब सध्या कोरोनाशी दोन हात करतंय. अशा कठीण काळी अश्विनने कुटुंबासमवेत राहण्याचा निर्णय घेतलाय. अश्विनने आयपीएच्या 14 व्या पर्वात दिल्लीसाठी 5 मॅचेस खेळल्या आहेत ज्यामध्ये त्याने केवळ 1 विकेट घेतली आहे. स्पर्धेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा अश्विन हा एकमेव खेळाडू आहे.
चेन्नई, पंजाब व्हाया दिल्ली- अश्विनचा प्रवास
चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांसाठी अश्विन याअगोदर खेळला होता. आताच्या मोसमात तो दिल्लीकडून खेळतो आहे. 2020 च्या हंगामाअगोदर दिल्लीने त्याला 7 कोटी 60 लाख रुपये देऊन खरेदी केले आहे.
अश्विनची आयपीएल कारकीर्द
आर. अश्विन दिल्लीचा बिनीचा शिलेदार आहे. केवळ अश्विन संघात असण्याने संघाला मोठा धीर असतो. तो विकेट टेकर फिरकीपटू आहे. अश्विन आतापर्यंत 159 आयपीएल मॅचेस खेळला आहे. त्यामध्ये त्याने 139 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर 419 रन्स देखील आहेत.