डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त उत्थान फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून उत्थान फाउंडेशन, पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष हरप्रितसिंग यांच्या अध्यक्षतेखाली संकल्प पुष्पमाला समिती, पिंपरी चिंचवड शहर, यांच्या तर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांसाठी वही, पुस्तके, पेन अशा शालेय उपयोगी वस्तूंचे संकलन करून महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात वाटप केले जाते. त्याच अनुषंगाने हरप्रितसिंग यांच्या अध्यक्षतेखाली उत्थान फाउंडेशनतर्फे आज (दि. १४) ५० डझन वह्या व ५०० पेन चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी संकल्प पुष्पमाला समिती, पिंपरी चिंचवड शहर चे समन्वयक रमेश जाधव, उत्थान फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष हरप्रीत सिंग, पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र राज्य एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे आणि उत्थान फाउंडेशनचे कार्यकर्ते जावेद शेख,अतुल आल्हाट, अमोल सूर्यवंशी, मंगेश शेटे, सागर अवसरे, सुरज पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once