मृतदेहांची गर्दी.. राख आणि हाडांचा खच...! विदारक दृश्याने सोलापुरातील स्मशानभूमीही गलबलली !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
सोलापूर, (प्रबोधन न्यूज) - स्मशानभूमीच्या बाहेर 'वेटिंग' ला असणारे मृतदेह..शेडमध्ये अवघ्या तीन-चार फुटांवर रचलेली सरणं.. कुठे धग्धगणाऱ्या चिता..तर कुठे राखेचा आणि त्यातून बाहेर पडलेल्या हाडांचा अस्ताव्यस्त खच...! अंगावर शहरे आणणाऱ्या या विदारक दृश्याने सोलापुरातील रुपाभवानी स्मशानभूमीची गलबलून गेली!
सोलापूर शहरात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहेत. परिणामी सरकारी हॉस्पिटल बरोबरच खाजगी हॉस्पिटलमध्ये खाटांची चणचण भासू लागली असतानाच आता अंतिम संस्कारासाठी कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी व्यवस्थित जागा मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंतिम संस्कार केल्यानंतर राख सावडण्याआधीच कोरोनाबाधित मृतदेहांची गर्दी होत असल्यामुळे तात्काळ दुसरे मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेत असल्यामुळे रुपाभवानी स्मशानभूमीत कोळसा, राख आणि हाडांचा खच पडल्याचं पाहायला मिळत आहे.
मागील दहा-बारा दिवसांपासून सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात कोरोनामुळे दररोज वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू होत आहे. शहरातील कोरोना बाधित मृतदेहांवर रुपाभवानी स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातात. कधीकधी ग्रामीण भागातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, गाव दूर असेल तर त्याचाही अंतिम संस्कार सोपस्कार इथेच पार पाडले जातात. मात्र सध्या मृतदेहांची संख्या पाहिली तर स्मशानभूमीतील जागा अपुरी पडू लागल्याचं चित्र आहे. रुपाभवानी स्मशानभूमीत मृतदेहाचे दहन करण्यासाठी दोन मोठे शेड असून बाजूला तीन काटे आहेत. मात्र आता दिवसाला पंधरा ते वीस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे जागा अपुरी पडू लागली आहे. यापूर्वी सोलापूर शहरात चार ते पाच देहावर अंत्यसंस्कार केले जायचे त्यावेळी जागेची इतकी अडचण भासत नव्हती, मात्र आता मात्र कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने स्मशानभूमीत दहन करण्यासाठी जागेची अडचण निर्माण होऊ लागली आहे, त्यामुळे अवघ्या दोन -तीन फुटांवरही चिता जाळल्या जात आहेत.