काय आहे चक्रीवादळ जवाद ? कसे पडले त्याचे नाव,  सोप्या शब्दात जाणून घ्या !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

काय आहे चक्रीवादळ जवाद ? कसे पडले त्याचे नाव,  सोप्या शब्दात जाणून घ्या !

नवी दिल्ली  -

भारतीय हवामान विभागाने देशभरात चक्रीवादळ जवाद संदर्भात अलर्ट जारी केला आहे. हे वादळ ४ डिसेंबरला ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत संबंधित विभाग सतर्क झाले आहेत. हे चक्रीवादळ 3 डिसेंबर रोजी मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्याशी संबंधित सर्व विभाग सतर्क आहेत.

नैऋत्य मान्सून संपल्यानंतर हे चक्रीवादळ आले आहे. जवाद चक्रीवादळ जेव्हा पृष्ठभागावर आदळते तेव्हा त्या काळात वारे ताशी 117 किलोमीटर वेगाने वाहू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशा स्थितीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. चला तर, जाणून घेऊया जावाद चक्रीवादळ काय आहे ? आणि या वादळाला जवाद हे नाव कसे पडले?

. जवाद हा अरबी शब्द आहे. अरबी भाषेत याचा अर्थ उदार किंवा दयाळू असा होतो. त्यामुळे हे वादळ फारसे धोकादायक ठरणार नाही. या चक्रीवादळाचा सामान्य जनजीवनावर इतर चक्री वादळांइतका विनाशकारी परिणाम होणार नाही.
. काही वृत्तानुसार या वादळाला जवाद सौदी अरेबियाच्या सूचनेवरून हे नाव देण्यात आले आहे. या वादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
. जवाद वादळाचा इशारा पाहता एनडीआरएफचे जवान बचाव कार्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच वेळी, गेल्या वर्षी मे महिन्यात अम्फान चक्रीवादळामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. या वादळामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. बचाव कार्यात लाखो लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.