मावळ लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची एक संधी द्या - संजोग वाघेरे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटलांची देहूरोडमध्ये प्रचारयात्रा
देहूरोड, (प्रबोधन न्यूज ) - माझ्यासारख्या सामान्य उमेदवाराचा पराभव करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात मोठमोठे सेलेब्रिटी आणि नेते विरोधकांना आणावे लागत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या निवडणुकीत आपेल प्रतिनिधीत्व करून काम करण्याची एक संधी द्या, अशी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी देहूरोडकरांना केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी बुधवारी (दि. 8 मे) देहूरोडसह परिसरातील गावामध्ये प्राचारयात्रा काढली. या यात्रेत त्यांनी गावागावात मतदारांशी संवाद साधत विजयी करण्याचे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले. या प्रचार यात्रेत संजोग वाघेरे पाटील यांच्यासमवेत शरद पवार गटाचे देहूरोड शहर अध्यक्ष मिकी खोचर, शिवसेना ठाकरे गटाचे भरत नायडू, देहूरोड कॉंग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमत्तू , सुनंदाताई आवळे, रमेश जाधव, शिवाजी दाभोळे, रेणू रेड्डी, हिरामण साळुंखे, विशाल दांगट, शिवशक्ती तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय राऊत, भैरवनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर राऊत, देहूरोड शहर काँग्रेस उपाध्यक्ष मोहनशेठ राऊत, शिवशंभो भजणी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. मुकुंद नाना राऊत, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय राऊत, नंदकुमार राऊत, गणेश राऊत, शिवाजी ठोंबरे, बाळासाहेब मराठे, राजु मराठे, अमोल द. राऊत, रोहिदास राऊत, सुशिल मराठे, नवनाथ राऊत, वैभव राऊत, काॅग्रेस मावळ तालुका सरचिटणीस रोहन राऊत, सचिन राऊत, विजेंद्र राऊत, विक्रम राऊत, अनिल राऊत, मजर खान, मधुकर देसाई, राम टिळेकर, रवि मळेकर, सचिन ईंगळे, मंगेश भोसले, संदीप जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मतदारांशी संवाद साधताना संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात मावळच्या विकासाची अक्षरशा वाटच लागली आहे. कोणतीच विकासकामे मार्गी लागलेली नाही. आपण मला नेतृत्वाची संधी द्यावी. या भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन देतो. त्याबरोबरच तालुक्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी देखील प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. या भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावता येतील. यासाठी ठोस भूमिका घेण्याचे काम केले जाईल.
या प्रचार यात्रेत संजोग वाघेरे पाटील यांनी मामुर्डी, देहूरोड, साईनगर परिसरातील विरबाबा मंदिर, साईमंदीरात दर्शन घेऊन राऊत नगर भागातील श्री.गणेश मंदिर व आदर्श नगर मधील दुर्गामाता मंदीराला भेट दिली. मामुर्डी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन वाघेरे पाटील यांनी ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराज मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. या वेळी सर्वच ठिकाणी ग्रामस्त गावकरी, महिला व युवकांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. वाघेरे यांच्या विजयामुळे दिलेला शब्द पाळणारे नेतृत्त्व मावळ लोकसभेला मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
मतदार संघात असलेल्या देहूसारख्या पवित्र भूमीसाठी काम करून दाखवू - वाघेरे
महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील एक धार्मिक स्थळ म्हणून देहू गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत तुकाराम महाराजांच्या वारीच्या काळात इथे लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक, पर्यटक येतात. त्यादृष्टीने देहू गावात असणारे रस्ते, वीज, पाणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. देहू हा आपला अध्यात्मिक वारसा आहे. त्या पवित्र भूमीसाठी काम करून दाखवू. विजयानंतर लोकप्रतिनिधी म्हणून या भागातील कामाला सुरूवात केली जाईल, असा विश्वास यावेळी वाघेरे पाटील यांनी दिला.