सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   गणेशोत्सव व ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस विभाग अलर्ट मोडवर आला आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून व्हॉट्‌सअप व इतर सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येत आहे. कोणताही प्रक्षोभक संदेश पसरू नये यासाठी करडी नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

आगामी सण उत्सव आणि विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कंबर कसली आहे. पोलीस विभागाला ‘अलर्ट’ मोडवर राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यातून प्रक्षोभक व्हाट्‌सअप मॅसेज पसरविणारे आणि त्यांना समाजमाध्यमांवर व्हायरल करणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून बारीक नजर ठेवण्यात येत आहे.

याशिवाय गस्त वाढविणे, समाजात शांतता ठेवण्यासाठी प्रत्येक समुदायातील संघटनांवर बारीक लक्ष ठेवणे, त्यांच्यातील संवाद वाढविणे, नेत्यांशी चर्चा करणे आणि इतर महत्वपूर्ण बाबीवर स्थानिक पोलीस ठाण्यांना निर्देश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तरुणांकडून अशा प्रकारांमध्ये कुठलाही सहभाग नोंदविण्यात येऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांचे समुपदेशन करणे, अशी घटना आढळल्यास त्यावर तत्काळ कारवाई करणे, कुठलाही छोटयातील छोटा गुन्हा असला तरी, त्यावर तत्काळ कारवाईचेही निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, विविध समुदायातील धार्मिक नेत्यांशी संवाद साधून त्यांना समाजात शांतता ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शिवाय परिसरात पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश स्थानिक पोलीस ठाण्यांना दिले आहेत.