भरधाव दुचाकीची पीएमपी बसला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भरधाव दुचाकीची पीएमपी बसला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव दुचाकीची पीएमपी बसला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने पीएमपी बसला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ढोरे पाटील ब्रिजवर सांगवी येथे घडली.
भीमराव भालेराव (वय 26, रा. उरुळी देवाची) असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अशोक बिभीषण गायकवाड (वय 43, रा. आळंदी) यांनी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपीएमएल मध्ये बस चालक म्हणून काम करतात. ते चिंचवड येथून मनपा पुणे येथे बस घेऊन जात होते. ते ढोरे पाटील ब्रिजवर आले असता त्यांच्या समोरून भीमराव भालेराव हे दुचाकीवरून भरधाव वेगात आले. त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून पीएमपी बसला धडक दिली. यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तसेच भिमराव हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.