यूजर आयडी पासवर्ड हॅक करून आयकर तपशील बदलला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - आयकर विभागाच्या संकेत स्थळावरील लॉगिनसाठी लागणारा युजर आयडी आणि पासवर्ड हॅक करून आयकर तपशील बदलला. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ऑगस्ट 2019 रोजी भाटनगर पिंपरी येथे घडली.
राजेश श्यामलाल कोरी (वय 39, रा. भाटनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी चार वर्षानंतर 12 ऑगस्ट 2023 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8948447218 या मोबाईल क्रमांक धारक आणि alkarajeshkoi@gmail.com या मेल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने आयकर विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करण्यासाठी लागणारा युजर आयडी आणि पासवर्ड हॅक केला. त्यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल नंबर काढून त्याऐवजी स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट केला. तसेच प्रायमरी ईमेल आयडी वरील फिर्यादी यांचा ईमेल आयडी काढून त्या ऐवजी आरोपीने त्याचा ईमेल आयडी अपडेट केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.