पादचारी महिलेचा विनयभंग दोघांना अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पादचारी महिलेचा विनयभंग दोघांना अटक

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -     रात्रीच्या वेळी मैत्रिणी सोबत शतपावली करत असलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 9) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दापोडी येथे घडली.

सागर शिवाजी माने (वय 32, रा. गणेश नगर, दापोडी), शुभम अतुल हिरे (वय 26, रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मैत्रिणी सोबत शतपावली करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादी यांना त्यांचा मोबाईल नंबर मागितला. तसेच फिर्यादीस नाव विचारत त्रास देऊ लागले. फिर्यादी यांनी आरोपींशी बोलणे टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.