जाब विचारल्याने तरुणाच्या कानाला चावा घेत पाडला तुकडा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जाब विचारल्याने तरुणाच्या कानाला चावा घेत पाडला तुकडा

   पिंपरी , (प्रबोधन  न्यूज )  -  घरावर दगड मारल्याचा जाब विचारल्याने तरुणाच्या कानाला चावा घेऊन कानाचा तुकडा पाडला. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथील 60 फुटी रोडवर घडली.

अभिजित उमाकांत शिंदे (वय 19, रा. मोरया पार्क गल्ली नंबर एक, 60 फुटी रोड, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नामदेव दशरथ साळुंके (रा. मोरया पार्क गल्ली नंबर एक, 60 फुटी रोड, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला 'तू आमच्या घरावर दगड का मारले, असा जाब विचारला. त्यावरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या उजव्या कानाला चावून कानाची पाळी तोडून त्यांना गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.