पुण्यात हात बांधून तरुणीवर बलात्कार

तरुणीने गांजा पिण्यास नकार दिल्याने तिच्या नाका-तोंडात गांजाचा धूर सोडून तिच्यावर केला लैंगिक अत्याचार.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात हात बांधून तरुणीवर बलात्कार

पुणे - दुसर्‍या मुलीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणीचे हात बांधून तिच्या तोंडावर गांजाचा धूर सोडून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संतापजनक प्रकार पुण्यातील उंड्री परिसरात घडला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी १७ मार्च रोजी घडला. श्रवण राजेंद्र अंकुशे (वय २२, रा. उंड्री) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून श्रवण आणि पीडित तरुणीचे प्रेम संबंध होते. मात्र, आरोपी तरुणाचे आणखी काही मुलींसोबत संबंध असल्याचे पीडित तरुणीला समजले होते. त्यानंतर पीडितेने श्रवणसोबत असलेले प्रेम संबंध तोडले होते. त्यानंतर आरोपी एक दिवस तिच्या घरी आला आणि तिला गांजा पिण्यास सांगितले. मात्र, गांजा पिण्यास तिने नकार दिला. तेव्हा श्रवण याने घराचा दरवाजा लावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला तिने नकार दिल्यावर त्याने फिर्यादीचे हात कपड्याने बांधले. गांजा ओढून त्याचा धूर त्याने तोंडाने फिर्यादीचे नाकात सोडला. तसेच तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. नाका, तोंडात गांजाचा धूर गेल्याने फिर्यादी यांना गुंगी आली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

ज्यावेळी तिची गुंगी उतरली त्यावेळी आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने कोंढवा पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.