आकुर्डी च्या डॉ. डी वाय पाटील औषधनिर्माण महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७४ वा स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये आकुर्डीच्या डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीला शहरी विभाग व्यावसायिक श्रेणी मधील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य भिकूजी दादा इदाते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ संजीव सोनवणे हे होते.
या पुरस्कारा अंतर्गत पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व तीन लाखाचा धनादेश प्राचार्य डॉ निरज व्यवहारे व संकुल संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी संयुक्तपणे स्विकारला. हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाच्या शेक्षणीक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला असून यासाठीमहाविद्यालयाच्या सर्व भागधारकांच्या योगदानामुळे शक्य झाला त्यामुळे प्राचार्य या नात्याने हा पुरस्कार स्वीकारताना मला अभिमान वाटला व आनंद झाला असे डॉ नीरज व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त केले. डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय राज्यातील एक नामांकित महाविद्यालय असून एनबिए चे नामांकन तसेच सी. आय. आय या राष्ट्रीय संस्थेचे प्लॅटिनम मानांकन प्राप्त आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे महाविद्यालय म्हणून ख्याती असणारे डी वाय पाटील फार्मसी हे विद्यार्थी आणि पालकांसाठी प्राधान्य पसंतीचे महाविद्यालय आहे हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. महाविद्यालयाच्या या यशासाठी आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी सर्व भागधारकांचे विशेष करून प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या