मोदींनी केलं शाहरुखच्या पठाणचं संसदेत सर्वांसमोर कौतुक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मोदींनी केलं शाहरुखच्या पठाणचं संसदेत सर्वांसमोर कौतुक

नवी दिल्ली (प्रबोधन न्यूज) - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.

25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्‍स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले असल्याचं दिसून आलं आहे. अश्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संसदेत सर्वांसमोर पठाण सिनेमा आणि अभिनेता शाहरुख खान याच विशेष कौतुक केलं आहे.

यावेळी मोदी म्हणाले, ‘श्रीनगरमध्ये अनेक दशकांनंतर चित्रपटगृहे हाऊसफुल्ल आहेत. पठाण पाहण्यासाठी काश्मीर मधील नागरिकांनी तीन दशकांनंतर हाउसफुल्ल गर्दी असून, चित्रपटगृह तब्बल 32 वर्षांनी हाउसफुल झालं असल्याचं दिसून आलं. काश्मीर सारख्या संवेदनशील ठिकाणी पठाण हाऊफुल्ल होणं हि फार मोठी गोष्ट होती…’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अभिनेता शाहरुख खान याच कौतूक केलं आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण सिनेमा जगभरात गाजतोय. शाहरुखच्या फॅन्सनी पठाणचं खुप कौतुक केलंय. याशिवाय एकदा नव्हे तर अनेकदा थियेटरमध्ये जाऊन शाहरुखच्या फॅन्सनी पठाण बघितलाय. पठाण ४०० कोटी क्लब मध्ये दाखल झालेला पहिला सिनेमा ठरलाय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पठाण आवडला असून त्यांनी संसदेत सर्वांसमोर पठाणचं कौतुक केलंय.

शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास चांगले संबंध आहेत. त्यामुळे ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत असलेल्या शाहरुख खानच्या पठाण बद्दल मोदींची प्रतिक्रिया काय याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण अखेर मोदींनी पठाण बद्दल मौन सोडलं आहे. संसदेत सर्व राजकीय नेत्यांसमोर मोदींनी पठाणचं कौतुक केलं. मोदी पठाण बद्दल थोडक्यात पण महत्वाचं बोलले.