पती पगाराचा आकडा सांगत नाही म्हणून पत्नीने चक्क RTI अंतर्गत माहिती मागवली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पती पगाराचा आकडा सांगत नाही म्हणून पत्नीने चक्क RTI अंतर्गत माहिती मागवली

बरेली (उत्तर प्रदेश) - आपल्याला नेमका किती पगार आहे हे अनेक नवरे आपल्या बायकोपासून लपवतात. बऱ्याचदा या वरून पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. पण आता नवरा जर आपली कमाई नेमकी किती आहे ते सांगत नसेल तर दुसऱ्या मार्गानेही ही माहिती मिळवता येते अशी आयडियाच बरेली येथील एका पत्नीने तमाम विवाहित स्त्रियांना दिली आहे.

तुम्ही किती कमावता? अशा प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी अनेक जण प्रत्येकाला देत नाही. सर्वसामान्यपणे याची माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली जाते. वैवाहिक संबंधात वाद असतील तर कमाईचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. दोघांच्या सहमतीने जर घटस्फोट होत नसेल तर पत्नीला पतीची कमाई जाणून घेऊन पोटगीची मागणी करते.

संजू गुप्ता नावाच्या महिलेनं पतीच्या उत्पन्नाची माहिती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता. सुरुवातीला बरेलीतील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती देण्यास नकार दिला होता. कारण पतीने यासाठी परवानगी दिली नव्हती. यानतंर महिलेनं एफएएकडे अपील दाखल करत मदत मागितली. एफएएने सीपीआयओच्या आदेश कायम ठेवला. त्यानंतर गुप्ता यांनी सीआयसीकडे दुसऱ्यांदा अर्ज केला.

सेंट्रल इन्फर्मेशन कमीशनने या प्रकरणी १९ सप्टेंबरला आदेश जारी केला. यासाठी सीआयसीने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला दिला. सीआयसीने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं की, महिलेला पतीचं उत्पन्न जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सीआयपीओने १५ दिवसात पतीच्या उत्पन्नाची माहिती द्यावी.