मृत्यूची आकडेवारी लपविणाऱ्यांवर कडक कारवाई करा – संजोग वाघेरे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल; अचानक वाढलेल्या आकड्यांमुळे घबराहट
पिंपरी, (प्रबाोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून रुग्णांच्या मृत्यूमध्येही वाढ झाली आहे. परंतु, या परस्थितीत महापालिका वैद्यकीय विभाग आणि शहरातील रुग्णालयांकडून मृत्यूची माहिती लपविली जात आहे. रुग्णालयाकडून उशिराने मृत्यूची नोंद करून रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल केली जात आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी लपविणे ही अतिशय गंभीर बाब आहे. याची आयुक्त राजेश पाटील यांनी दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाचा उद्रेक झाला आहे. करोना बाधितांचे मृत्यू वाढले आहेत. महापालिका हद्दीतील रुग्णालयांकडून करोना बाधितांच्या मृत्यूची माहिती वेळेत दिली जात नाही. त्यामुळे अचानक शहरात मृत्यूचा आकडा वाढल्याचे समोर येत आहे. सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात मृत्यूची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात २३ एप्रिल रोजी ७१ मृत्यूची, तर २४ एप्रिल रोजी ८१ मृत्यूची नोंद झाली होती. प्रत्यक्षात दोन्ही दिवसांत मागील २४ तासांत अनुक्रमे ८ व १२ मृत्यू झालेले आहेत. परंतु रुग्णालयांनी मृत्यूची माहिती उशिराने कळविल्याने मृत्यूचे आकडे वाढल्याचे वैद्यकीय विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वैद्यकीय विभागांकडून दैनंदिन दिल्या जाणाऱ्या माहितीत व प्रत्यक्ष शहरात झालेले मृत्यू यात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून एप्रिल महिन्यात महापालिकेने आठशेहून अधिक मृत्यूची माहिती लपविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने गंभीर दखल घ्यावी. योग्य चौकशी करून दोषी आढळणाऱ्या रुग्णालये, संबधितांवर व्यवस्थापनावर कारवाई करावी. करोना बाधित मृत्यूची कोणतीही आकडेवारी लपविली जाणार नाही, करोना बाधित रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांचा छळ होणार नाही, याची संपूर्ण खबरदारी महापालिकेने घ्यावी, असेही वाघेरे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.