पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर आधूनिक निरो !- सचिन सावंत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - मोदी सरकारने महाराष्ट्राला रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा न करण्याचा आदेश रेमेडेसिव्हीरची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना दिला आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची धमकीसुद्धा केंद्राने दिली आहे. हे कृत्य अत्यंत क्रूर आणि भयंकर असून देश कोरोना संकटात जळत असताना नरेंद्र मोदी नामक आधुनिक निरो निवडणूक प्रचारात मग्न आहे, असा घणाघाती शाब्दिक हल्ला काँग्रेसचे प्रवक्तेसचिन सावंत यांनी मोदींवर केला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. राज्यात सर्वच जिल्ह्यांत रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मोदी सरकारने महाराष्ट्राला रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा न करण्याचा आदेश रेमेडेसिव्हीरची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना दिला आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची धमकीसुद्धा केंद्राने दिली आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून राज्याला ऑक्सिजन आणि रेमेडेसिव्हीरचा पुरवठा करण्याची मागणी केली. परंतु पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असे कळवण्यात आले. यातूनच हे आधुनिक निरो देश जळत असताना निवडणूक प्रचारात मग्न आहेत, अशी घणाघाती टीकासुद्धा सावंत यांनी केली. तसेच केंद्र जर राज्याला रेमेडेसिव्हीरचा पुरवठा होऊ देणार नसेल तर महाराष्ट्र सरकारने या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीसुद्धा सावंत यांनी केली.